प्रतिनिधी / बेळगाव
जितो संस्थेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आल्या. उन्हाळय़ाने लोकांना तहान लागत असून पाणी पाणी होत आहे. बाहेरुन येणाऱया लोकांना पाणी मिळावे व त्यांची तहान भागावी यासाठी तसेच रस्तोरस्ती व्यापार करणाऱया क्यापाऱयांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
शहरातील मंगलदीप कॉर्नर, गणपत गल्ली, गौतम फॅब्रीक्स शहापूर, जैनम सिरॅमिक्स उद्यमबाग यासह चार ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली. जितो संस्थेचे बेळगाव विभागाचे अध्यक्ष सुनील कटारिया यांच्या कल्पनेतून या पाणपोई सुरू करण्यात आल्या.
पुढील दोन महिने ही योजना राबविण्यात येणार असून जितो अपेक्सचे संचालक सतीश मेहता, के.के.जी. विभागाचे सहकार्यवाह विक्रम जैन यांच्या हस्ते या पाणपोईंचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जितोचे कार्यवाह अंकित खोडा, सहकार्यवाह अमित दोशी, सदस्य मुकेश पोरवाल, जीवन पोरवाल, धनसुख जैन, महेंद्र परमार, राजेंद्र जक्कण्णावर, विजय पाटील, दिनेश मेहता, भरत जैन, खोडा परिवार आदी उपस्थित होते.