प्रतिनिधी /बेळगाव
जितो बेलगाम लेडीज विंग तर्फे शनिवार दि. 16 ऑक्टोबर रोजी 3 वा. महावीर भवन येथे ‘शुभारंभ’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षा रूपाली जनाज यांनी नविन सदस्यांचे स्वागत केले तसेच केकेजी झोन समन्वयक भारती हर्दी यांनी मार्गदर्शन केले. स्वयंम समन्वयक शिल्पा हजारे यांनी महिलांनी विशेषतः ग्रामीण भागातील नविन सदस्यांनी आपल्या कौशल्याचा तसेच उद्योगाच्या विकासासाठी जितो व्यासपीठाचा उपयोग करून घ्यावा असे सांगीतले. वर्षभरातील प्रोजेक्टसाठी गट करून वर्षभरात कार्य प्रकल्प केले जातील याबाबत कार्यवाह रूमा पाटील यांनी माहिती दिली.
यानंतर उपस्थित सदस्यांसाठी गरबा व दांडियाचे आयोजन केले होते. यावेळी पाहुण्या म्हणून श्रीमती स्वाती कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनी उत्तम गरबा दांडिया खेळणाऱया तसेच उत्तम वेशभूषा केलेल्या महिलांना बक्षिसे देऊन सन्मानित केले. यावेळी इव्हेंट हेड मिनल शहा आणि सर्व कार्यकारी मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ममता जैन यांनी केले तर कार्यवाह रूमा पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.