भारत बायोटेक लसीकरणासाठी 78 जणांची नोंद, `सीपीआर’मध्ये तीन दिवसांत 60 जणांना लस
प्रतिनिधी/कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधक प्रायोगिक लसीकरणासाठी गुरूवारी 78 स्वयंसेवकांनी नोंदणी केली तर 60 जणांना लस टोचण्यात आली. सुटीदिवशीही लसिकरण सुरू राहणार आहे. दरम्यान, जिनोव्हा लसीच्या परवानगीसाठी राज्यस्तरावर हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
`सीपीआर’मध्ये भारत बायोटेक लस चाचणीला मंगळवारी सुरूवात झाली. स्वयंसेवकांची नोंदणी आणि लस नोंदणीसाठी सीपीआरच्या जुन्या इमारतीत तिसऱया मजल्यावर स्टाफ नियुक्त केला आहे. तेथेच सध्या लसीकरणाचे काम सुरू आहे. पण सीपीआरमध्ये येणाऱयांना हे कार्यालय लवकर सापडत नाही, त्यामुळे गुरूवारी क्रोम वॉर्डशेजारीच मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात शुक्रवारपासून स्वयंसेवकांची नोंदणी केली जाणार आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला नोंदणी, लसीनंतर 500 रूपये आणि 4 मास्क देण्यात येणार आहेत. भारत बायोटेकची लस स्वयंसेवकांना एकदा दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. नोंदणीसाठी इच्छुकांनी आधारकार्ड आणल्यास लसीकरण प्रक्रिया लवकर होणे शक्य आहे. शुक्रवारी ख्रिसमसची सुटी असली तरी लसिकरणासाठी नोंदणी अन् लस टोचणी सुरू राहणार आहे.
सीपीआरमध्ये क्रोम कंपनीच्या माध्यमातून जिनोव्हा कंपनीची `एम आरएनए’ लस प्रायोगिक लसीकरणासाठी येणार आहे. यासंदर्भात परवानगीसाठी आतापासून जिल्हा स्तरावरून राज्यस्तरापर्यत हालचाली सुरू आहेत. नव्या वर्षांत एप्रिलनंतर या नव्या लसीची प्रायोगिक चाचणीही कोल्हापूर जिल्हÎात सुरू होण्याची शक्यता अधिकृत सुत्रांनी व्यक्त केली आहे.