खांद्याचे हाड तुटले, कंबरेलाही दुखापत
पाटणा / वृत्तसंस्था
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव जिन्यावरून पडल्याने जखमी झाले आहेत. पाटणा येथील राबडीदेवी निवासस्थानी पायऱया चढत असताना ते खाली पडल्याचे वृत्त आहे. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. त्यांच्या उजव्या खांद्याचे हाड तुटले असून पाठ आणि कमरेलाही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर कंकरबाग येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. हाताला प्लास्टर घातल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. सध्या त्यांना घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱयांकडून देण्यात आला आहे.