केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने सीसीके धारवाड अ संघाचा 165 धावांनी, बीडीकेने हुबळी क्रिकेट अकादमी अ चा 109 धावांनी, बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाने आनंद अकादमी अ चा 8 गडय़ांनी पराभव करून तर युनियन जिमखाना संघाने हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 150 धावांनी पराभव करून प्रत्येकी चार गुण मिळविले. दीपक राक्षे (जिमखाना) विजय पाटील (बीएससी बी), आकाश कटांबळे (बीएससी ए), अनिरूद्ध जोशी (बीडीके) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आरआयएस हुबळी येथे बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात सर्वबाद 364 धावा केल्या. आकाश कटांबळेने 4 षटकार 11 चौकारासह 87, आदर्श माळीने 1 षटकार 13 चौकारासह 80, अमर घाळीने 2 षटकार 9 चौकारासह 62, सुदीप सातेरीने 24, पार्थ पाटीलने 13 धावा केल्या. सीसीके अ धारवाडतर्फे राहुल मानेने 71 धावात 3, आदित्य शानभागने 53 धावात 2, लिखीत बन्नूरने 62 धावात 2 तर काकेश पाटील, सुजोश जमाजाद, तेजस मुर्डेश्वर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल सीसीके अ धारवाड संघाचा डाव 30.2 षटकात 199 धावात आटोपला. सचिन रजपूतने 1 षटकार 13 चौकारासह 86, लिखीत बन्नूरने 48, राहुल वेर्णेकरने 36, तेजस मुर्डेश्वरने 14 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे पार्थ पाटीलने 59 धावात 4, अमर घाळीने 13 धावात 3, राहुल वाजंत्री, आकाश कटांबळे, ओंकार वेर्णेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
केएससीए हुबळी मैदानावर बीडीके अ हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 311 धावा केल्या. अनिरूद्ध जोशीने 5 षटकार 11 चौकारासह 111 धावांची शतकी खेळी साकारली. शिषीर भवानीने 73, समर्थ गुंजाळने 48, आकाश भूषदने 44, साहिल सावडाने 18 धावा केल्या. हुबळी क्रिकेट अकादमीतर्फे महांतेश के ने 61 धावात 3, मुदस्सरनझर यलगौरेश बागलकोट यांनी प्रत्येकी 2 तर अर्जुन पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल हुबळी क्रिकेट अकादमी संघाचा डाव 48.3 षटाकात 210 डावात आटोपला. आदित्य एच. एन. ने 52, मिलिंद रमेशने 45, अमोद कालवीने 26, सफलशेट्टीने 21, मुदस्सरनझर व महांतेश के यांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. बीडीकेतर्फे अनिरूद्ध जोशीने 31 धावात 4, कार्तिक अरमोगमने 34 धावात 2, साहील सावडा, फरहान पाटील, कृष्णा बागदी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
केएससीए बेळगाव मैदानावर आनंद क्रिकेट अकादमी अ संघाने 36.6 षटकात सर्वबाद 149 धावा केल्या. रोहित पाटीलने 49, यश कळसण्णावर व किरण पुजारी यांनी प्रत्येकी 20, विनोद देवाडीगानी 18, तर हर्ष पॅट्रॉटने 13 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब तर्फे आकाश असलकरने 43 धावात 3, विजयकुमार पाटीलने 10 धावात 2, रोहित ढवळेने 30 धावात 2, तनिष्क नाईकने 34 धावात 2, ध्रुव देसाईने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाने 20.4 षटकात 2 बाद 151 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. वेंकटेश शिराळकरने नाबात 54, विजय पाटीलने नाबाद 35, अमित यादवने 30, केदार ऊसुलकरने 19 धावा केल्या.
युनियन जिमखाना मैदानावर जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 371 धावांचा डेंगर रचला. वैष्णव संघमित्राने 11 षटकार 16 चौकारासह नाबाद 198 धावा केल्या. तो द्विशतकापासून अवघ्या 2 धावांनी वंचित राहिला. प्रवीण हिरेमठने 35, अमय भातकांडेने 33, ऋषिकेश रजपुतने 33, दीपक राक्षेने 26, सर्फराज मुल्लाने 17 धावा केल्या. हुबळीतर्फे इमार जाफरने 2, सतिश एन, तरुण हिरेमठ, निखील दोडमनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी संघाचा डाव 34.4 षटकात 221 धावात आटोपला. त्यात महादेवने 56, इमार जाफरने 62 धावा केल्या. जिमखानातर्फे दीपक राक्षेने 68 धावात 5, शिवानंद पाटीलने 29 धावात 3, ऋषिकेश रजपूतने 2 गडी बाद केले.