माळमारूती चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धा : माडिवाले, राहुल नाईक सामनावीराचे मानकरी
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित माळ मारुती चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी युनायटेड बालाजी स्पोर्ट्स संघाने सिग्नेचर संघाचा 5 गडय़ांनी, व युनियन जिमखाना संघाने ऍडव्होकेट संघाचा 44 धावानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. आलिम माडिवाले (युनायटेड बालाजी स्पोर्ट्स), राहुल नाईक (जिमखाना) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात युनायटेड बालाजी संघाने प्रथम फलंदाजी करताना सिग्नेचर संघाने सर्वबाद 160 धावा केल्या. मनोज पाटीलने सर्वाधिक 43, योगेश जाधवने 38, मंगेश पाटीलने 16 धावा केल्या. बालाजी स्पोर्ट्सतर्फे वीरेश गौडर 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल युनायटेड बालाजी स्पोर्ट्स संघाने 19.2 षटकात 5 गडी बाद 161 धावा करून सामना 5 गडय़ाने जिंकला. त्यात रवी कोणगलाटीने 39, आलीम माडीवालेने चार षटकारांसह 34, शिवप्रसादने 26 तर जावेद मुद्दनुरने 22 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे भरत गडेकरने 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 228 धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार राहुल नाईक 9 षटकार 6 चौकारांसह केवळ 39 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या. तर त्याला मिलिंद चव्हाण 7 षटकार 8 चौकारांसह 30 चेंडूत 80 धावा, चंदन कुंदरणाड नाबाद 18 धावा करून सुरेख साथ दिली.
ऍडव्होकेट तर्फे मनीकंठ एस 2 गडी बाद केले प्रत्युत्तरादाखल ऍडव्होकेट संघाने 20 षटकात 6 बाद 184 धावाच केल्या. त्यात सलमान गोकाककर सर्वाधिक 64, विशाल गोरगोंडाने 54, बसवराज जरळीने 25, शुभम चौधरी 17 धावा केल्या.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे ईरय्या कलमठ विजय खूरी व एन बी पाटील यांच्या हस्ते सामनावीर व सर्वाधिक षटकार आलिम माडीवाले व उत्कृष्ट झेल अविनाश, इम्पॅक्ट खेळाडू रवि कोनगलाटी यांना चषक देऊन गौरवण्यात आले.
दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे सागर गोरगोंडा, राघवेंद्र दैवज्ञ व प्रवीण कराडे यांच्या हस्ते सामनावीर राहुल नाईक, इम्पॅक्ट खेळाडू मिलिंद चव्हाण व चंदन कुंदरनाड यांना चषक देवून गौरविण्यात आले.