मुंबई
रिलायन्स जियो इन्फोकॉमने जियोफायबरअंतर्गत नव्या ग्राहकांसाठी नवी ऑफर सादर केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना 30 दिवस मोफत ब्रॉडबँड सेवा देणार आहे. यात कंपनी 4 के सेटटॉपबॉक्सही मोफत देणार असून यात मोफत कॉलिंगची सुविधाही समाविष्ट असणार असल्याचे सांगितले जाते. समाधान न झाल्यास 30 दिवसानंतर ग्राहकाला सेवा परत कंपनीला परत करता येणार आहे. नये इंडिया का नया जोश अंतर्गत कंपनीने ब्रॉडबँड सेवेंतर्गत 399 रुपये महिन्याचा नवा प्लॅन सादर केला आहे. ही सेवा 1 सप्टेंबरपासून कार्यरत होईल. यात अमर्याद इंटरनेट, उत्तम स्पीड अशा सुविधेचा लाभ ग्राहकांना घेता येईल. यावर नेटफ्लिक्सचाही ग्राहकांना आनंद घेता येणार असून 1600 शहरात ही सेवा दिली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले.