मुंबई
रिलायन्सच्या मालकीच्या जियोने आपला पहिला 4 जी स्मार्टफोन जियोफोन नेक्स्टचे सादरीकरण नक्की केले आहे. दिवाळीत हा फोन सर्वांना 6 हजार 499 रुपयांना उपलब्ध होणार अहे. ग्राहकांना हा फोन 1 हजार 999 रुपये भरून उर्वरीत रककम 18 ते 24 महिन्याच्या इएमआयसह खरेदी करण्याची संधी असणार आहे.दिवाळीत हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सदरचा फोन हा रिलायन्स जियो व गुगल यांनी एकत्रित विकसित करत तयार केला आहे. विविध चार योजनांच्या सहाय्याने हा फोन खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांपुढे असणार आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळ www.jio.com/next यावर जाऊन ग्राहकांना फोन मागवता येतो.