प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शुक्रवारी शाहूवाडी तालुक्यातील वृद्धेचा मृत्यू झाला होता. तिचा स्वॅब रिपोर्ट रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्य़ातील कोरोना बळींची संख्या 6 वर पोहोचली. शनिवारी सीपीआरमधील कोरोना वॉर्डमध्ये हातकणंगले तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. त्याचा स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आहे. दरम्यान, रात्रीपर्यत 28 पॉझिटिव्ह आल्याने कोरोना रूग्णसंख्या 590 वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हय़ात रविवारी रात्री आठ वाजेपर्यत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 590 झाली. 385 रिपोर्टपैकी 28 पॉझिटिव्ह तर 356 निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह रूग्णांत आजरा 4, भुदरगड 5, चंदगड 6, कागल 10 व शाहूवाडी 3 यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी दिली.