आज 25 रुग्णांची वाढ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 427 वर
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हयात कोरोना संसर्गाचा उदेक सुरूच असून गुरुवारी 12.30 वाजता जिल्हा आरोग्य विभागाला आलेल्या अहवालात आणखी 25 रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली आहे. जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या 427 वर पोहोचली आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील यांनी दिली आहे.
कोरोनामुळे आजअखेर चार जणांचा मृत्यू
जिल्हयात बुधवारी (दि.27) कोरोनाचा चौथा बळी गेला. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या यमेहटी (ता.गडहिंग्लज) येथील 52 वर्षीय व्यक्तीचा गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला. सायंकाळी त्यांचा स्वॅब नमुन्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामुळे जिल्हयातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4 वर पोहोचली आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 427 वर पोहोचली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनीही आरोग्याची दक्षाता घेणे आवश्यक बनले असून सार्वजनिक ठिकाणी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
दरम्यान, बुधवारी (दि.27) रात्री ते गुरूवारी सकाळी 10 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हयात नविन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 402 वर स्थिर होती. तसेच रात्रीपासून आणखी 3 रूग्णांनी डिसजार्च मिळाला आहे.
गडहिंग्लजमध्ये सलग दोन दिवसात दोघांचा मृत्यू
गडहिंग्लज तालुक्यात सलग दोन दिवसात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा हादरली आहे. बुधवारी दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19 ने वाढल्याने चारशेचा आकडा आलांडला. तर सीपीआरसह विविध कोरोना केअर सेंटर्समध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या 19 जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातून †िडस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे.
आजअखेर कोरोनावर 42 रुग्णांची मात
कोरोनावर मात करून घरी पाठविण्यात आलेल्या रुग्णांची आजअखेरची संख्या आता 42 वर पोहोचली असून आढळणाऱया रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होण्याची जिल्हयातील रुग्णांची संख्या सध्या दहा टक्केपेक्षा अधिक आहे.