साडे 21 हजारांची दारु जप्त : 23 जणांवर कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून जिल्हय़ातील अवैध दारु, मटका यावर पोलिसांकडून सुरु असलेले धाडसत्र सुरुच असून गेल्या दोन दिवसात जिल्हय़ात विविध ठिकाणी अवैध दारु विक्री करणाऱया 23 जणांवर करत पोलिसांनी 21 हजार 484 रुपयांची देशी, गावठी दारु हस्तगत केली आहे.
यामध्ये फलटण पोलिसांनी दुधेबावीत देवीदास संपत सोनवलकर, पुसेगाव पोलिसांनी राजापूर, ता. खटाव येथे तानाजी हणमंत जाधव, डिस्कळ येथे श्रीरंग सिताराम कोरडे, कराड शहर पोलिसांनी सैदापूर, ता. कराड येथे संतोष रामचंद्र महापुरे, ढेबेवाडी पोलिसांनी धामणी येथे महादेव केशव मोरे, सातारा तालुका पोलिसांनी मुळीकवाडी येथे धर्माजी पिराजी कांबळे, म्हसवड पोलिसांनी गंगोती, ता. माण येथे विलास पोपट पवार, रहिमतपूर पोलिसांनी रिकीबदारवाडी येथे गोरख अधिकराव घाडगे, कराड तालुका पोलिसांनी कोळे येथे अतिश गणपत शिंगण (रा. शिंगणवाडी) याच्यावर कारवाई केली आहे.
खंडाळा पोलिसांनी खंडाळय़ात अपुंश रामचंद्र भिसे, विनोद सर्जेराव मोरे तसेच असवली, ता. खंडाळा येथे प्रज्वल संतोष मोरे, लोणंद पोलिसांनी तरडगाव येथे त्याच गावातील विकास शिवाजी गायकवाड, उंब्रज पोलिसांनी चाफळ, ता. पाटणे येथे मुरलीधर बाळकृष्ण थोरात, वडूज पोलिसांनी मांडवे, ता. खटाव येथे तुकाराम शंकर पाटोळे, चितळी, ता. खटाव येथे दादासो तानाजी कोकरे, दहिवडी पोलिसांनी पांढरवाडी, ता. माण येथे जर्नादन शंकर सूर्यवंशी, बोरगाव पोलिसांनी वर्णे, ता. सातारा येथे अकुंश संपत मोहिते, फलटण शहर पोलिसांनी मंगळवार पेठ, फलटण येथे संगिता तानाजी अहिवळे तर सातारा शहरात शाहूपुरी पोलिसांनी आकाशवाणी झोपडपट्टीत मका दादू सपकाळ याच्यावर कारवाई केली आहे.
या सर्व कारवायांमध्ये 21 हजार 484 रुपयांची अवैध दारु जप्त केली असून 23 जणांवर सीआरपीसी 41 अ अन्वये कारवाई करण्यात आली असल्याची माहिती डिस्ट्रीक्ट क्राईम रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.