एम. जी. हिरेमठ घेणार पदभार
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानपरिषदेची निवडणूक असल्यामुळे बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी आर. व्यंकटेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक झाल्यानंतर अधिवेशनदेखील झाले. त्यामुळे त्यांनीच या काळात जिल्हाधिकाऱयांचा पदभार सांभाळला होता.
आता पुन्हा राज्याच्या मुख्य सचिवांनी एम. जी. हिरेमठ यांची जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे एम. जी. हिरेमठ हे पदभार स्वीकारणार आहेत.