प्रतिनिधी/ नागठाणे
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हा स्तरीय शुभारंभ नूतन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते नागठाणे (ता.सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संपन्न झाला.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठले,प्रांताधिकारी मिनाज मुल्ला,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोल गद्दीकर, तहसीलदार आशा होळकर,जि. प.सदस्या भाग्यश्री मोहिते,पं. स.सदस्या बेबीताई जाधव,विजयाताई गुरव,आरसीएच अधिकारी प्रमोद शिर्के,सरपंच विष्णू साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेखर सिंह म्हणाले की,सातारा जिह्यामध्ये 2.42 लाख लाभार्थ्यांना 2457 पोलिओ लसीकरण केंद्रामार्फत डोस देण्यात येणार आहेत.यापैकी रेल्वेस्थानक,बसस्थानक,टोलनाके,मोबाईल बूथ ,भटक्या वस्त्या व झोपडया,ऊसतोड मजुरांची पाले,वीटभट्टी कामगार वसाहत व स्थलांतरित वस्त्या अश्या ठिकाणी असणाया प्रत्येक बालकांना हा डोस देण्यात येणार आहे.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.जे.कांबळे यांनी नूतन जिल्हाधिकाऱयांचे स्वागत केले. नूतन जिल्हाधिकायांच्या हस्ते यावेळी लहान बालकास पोलिओ डोस देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.या वेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले
कार्यक्रमास डॉ.पराग जोशी,डॉ.रविराज निकम,प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी,आशा,अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.