प्रतिनिधी /बेळगाव
अंथरुण धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार भावंडांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला होता. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हल्याळ (ता. अथणी) येथील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे.
शंकर बनसोडे व त्यांच्या तीन भावंडांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला होता. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार महेश कुमठळ्ळी आदींनी हल्याळला भेट देऊन शंकरच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. रविवारी जिल्हाधिकाऱयांनीही हल्याळला भेट दिली.
चारही मृत भावंडांचे वडील गोपाल बनसोडे यांचे सांत्वन करण्यात आले. या कुटुंबीयांना सरकारकडून मिळणाऱया सोयीसुविधा मिळवून देण्यात येतील. कुटुंबातील मुलांना सरकारच्या निवासी शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.