प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी डॉ. हरिशकुमार यांनी भेट दिली. यावेळी शाळेमध्ये असलेल्या वसतिगृहात तसेच मतदान केंद्रांची पाहणी केली. याचबरोबर सीमाभागामध्ये असलेल्या चेकपोस्ट नाक्मयाचीही पाहणी त्यांनी केली.
लोकसभा पोटनिवडणूक दि. 17 एप्रिल रोजी होत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मतदान केंद्रांची तयारी करण्याबाबत जिल्हाधिकाऱयांनी सूचना केली. त्यानंतर आता त्या मतदान केंद्रांवर पाण्याची सोय व इतर सुविधा उपलब्ध करण्याबाबत पाहणी केली आहे.
बिजगर्णी जवळील धामणे एस., हिंडलगा येथे भेट दिली. याचबरोबर राकसकोप येथे उभारण्यात आलेल्या चेकपोस्ट नाक्मयाची पाहणी देखील त्यांनी केली आहे. यावेळी अधिकाऱयांना त्यांनी सूचना केल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त के. त्यागराजन, बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.