प्रतिनिधी / मिरज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चौथ्या स्तराचे निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तरी सुद्धा मिरजेतील काही व व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाकडून मिरजेत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मिरजेत ९ दंडात्मक कारवाया प्रशासनाकडून करण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त उपायुक्त याना निवेदन देत व्यापारासाठी दुकाने खुली करण्यासाठी परवानगीचे निवेदन देण्यात आले होते व दुकाने उघडण्याचा इशारा दिला होता. आजच्या कारवाईने पुन्हा एकदा दुकाने बंद करण्यात आली.