ऑनलाइन टीम / पुणे :
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय गायन, वक्तृत्व स्पर्धा, शास्त्रीय नृत्य – कथकली, भरतनाट्यम अशा विविध स्पर्धांमधून महाविद्यालयीन तरुणाईने आपला कलाविष्कार सादर केला. पूना कॉलेज ऑफ आर्टस अॅन्ड कॉमर्सच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा व युवक संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय एकात्मता संघटना, पूना कॉलेज ऑफ आर्टस अॅन्ड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते विभागीय स्तरावर पुणे जिल्हयाचे नेतृत्व करणार आहेत.