क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटना आयोजित ड्रीम्स रोलर स्केटिंग ऑफ बेलगाम यांच्या सहयोगाने 15 वी खुली जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली. 120 स्केटर्सनी त्यात भाग घेतला होता.
या स्केटिंग स्पर्धेचे उद्घाटन संतोष श्रींगारी, विनायक काकतीकर, तुकाराम शिंदे, शंकर कांबळे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्कॉड, इनलाईन व टेनासीटी या तीन प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. स्कॉड स्केटिंगमध्ये 5 वर्षाखालील मुलांच्या गटात विधीत बी.ने 2 सुवर्ण, अमोघ बर्डेने 2 रौप्य, आरव केकरेने कांस्यपदक पटकावले. 5 ते 7 मुलांच्या वयोगटात समीत कणगलीने 2 सुवर्ण, सार्थक चव्हाणने 2 रौप्य, रूद्र पाटीलने 2 कांस्यपदके मिळविली. 5 ते 7 मुलींच्या वयोगटात लावण्या सुतारने 2 सुवर्ण, आयुषी काकतकरने 2 रौप्य, 7 ते 9 मुलांच्या वयोगटात अवनिश कामण्णावरने 2 सुवर्ण, ध्रुव पाटीलने रौप्य, अभय पाटीलने कांस्य, कुलदीप बिर्जेने रौप्य, सर्वेश पाटीलने 1 कांस्यपदक घेतले. मुलींच्या गटात प्रांजल पाटीलने 2 सुवर्ण, 9 ते 11 मुलांच्या वयोगटात भव्य पाटीलने 2 सुवर्ण, सुब्रम्हण्यमने रौप्य व कांस्य, सत्यम पाटीलने रौप्य, अथर्व भयातीने 1 कांस्यपदक पटकाविले. मुलींच्या गटात अनघा जोशीने 2 सुवर्ण, 11 ते 14 मुलांच्या वयोगटात सौरभ साळुंखेने 2 सुवर्ण, श्री रोकडेने 2 रौप्य, सोहन हिरेमठने 2 कांस्य, मुलींच्या गटात शर्वरी दड्डीकरने 2 सुवर्ण, सायली काळुचेने 2 रौप्य, वैष्णवी कांबळेने 2 कांस्यपदके पटकाविली. मुलांच्या 14 ते 17 वयोगटात निहार मजुकरने 2 सुवर्ण, साईसमर्थ साकेने 2 रौप्य, नीलमाधव मजलीकरने 2 कांस्य, 17 वर्षावरील मुलांच्या गटात कृष्णा शर्माने 2 सुवर्णपदके पटकाविली.
इनलाईन स्केटिंगमध्ये 7 ते 9 मुलांच्या वयोगटात विहान कनगलीने 1 सुवर्ण, 1 रौप्य, अवनिश कोरीशट्टीने 1 सुवर्ण, 1 रौप्य, समर्थ पाटीलने 2 कांस्य, 9 ते 11 मुलांच्या वयोगटात निश्चित भस्मेने 1 सुवर्ण, 1 रौप्य, अथर्व भूतेने 1 सुवर्ण, 1 रौप्य, ध्रुव कुलकर्णीने 2 कांस्यपदके पटकाविली. मुलींच्या गटात विपुरा काकतीकरने 2 सुवर्ण, अक्षरा केकरेने 1 रौप्य, स्वाती राहुलने कांस्य, साची राहुलने कांस्यपदक घेतले. 11 ते 14 मुलांच्या वयोगटात सम्मेद अक्कीने 2 सुवर्ण, श्रेयस बजंत्रीने 2 रौप्य तर मुलींच्या गटात तुलशी हिंडलगेकरने 2 सुवर्णपदके मिळविली. टेनासीटी स्केटिंग प्रकारात 11 ते 14 मुलांच्या वयोगटात हर्षद जाधवने 2 सुवर्ण, 9 ते 11 मुलींच्या गटात मृणाल कुरबेटने 2 सुवर्णपदके पटकाविली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गंगणे, शुभम साके, सक्षम जाधव, यशपाल पुरोहित, सोहम हिंडलगेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.