प्रतिनिधी /बेळगाव
शोटोकॉन कराटे डू असोसिएशन ऑफ इंडियाच्या कर्नाटक शाखेतर्फे आयोजित खुल्या कराटे स्पर्धेत शोटोकॉन स्पोर्ट्स संघटनेच्या कराटेपटूंनी विविध प्रकारांत यश संपादन केले.
मजगाव येथील ब्रह्मनगर लक्ष्मी हॉलमध्ये शोटोकॉन कराटे डू असोसिएशन ऑफ इंडियाच्या कर्नाटक शाखेतर्फे जिल्हास्तरीय खुल्या कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत बेळगावसह सांगली, कोल्हापूर, चंदगड, खानापूर येथील कराटेपटूंनी भाग घेतला होता. त्यात शोटोकॉन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विजयनगर-हिंडलगा शाखेच्या कराटेपटूंनी विविध प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करून पदके मिळवली.
6 वर्षांखालील गटात धन्वी मोरजकर, 8 वर्षांखालील गटात सक्षम पाटील, पवित साळुंखे, 9 वर्षांखालील गटात वैभवी मोरजकर, 10 वर्षांखालील गटात श्रेयस कडोलकर, स्फूर्ती नांदवडेकर, भक्ती भोवी, 11 वर्षांखालील गटात नेहाल पाटील, ओमकार शिंदे, 12 वर्षांखालील गटात श्रेयस कुंडेकर, प्रेमजीत भावलदे, शुभम साळुंखे, निक्सी लिमा, यश मेणसे, योगेश चलवेटकर यांनी कटा, कुमिटे आदी प्रकारात सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके मिळवली. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कराटे प्रशिक्षक भरमाणी पाटील चलवेनहट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ते सराव करीत आहेत.