प्रतिनिधी/ खेड
वेरळ येथील समर्थ कृपा इंग्लिश स्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय पिंचाक सिलाट फाईट स्पर्धेत खेड संघाने 40 सुवर्णपदके, 10 रौप्य व 4 कांस्यपदके पटकावून प्रथम क्रमांकाचा चॅम्पियनशिप चषक पटकावला. 35 सुवर्णपदके 12 रौप्य व 10 कास्य पदके पटकावून दापोली संघाने द्वितीय चॅम्पियनशिप चषक पटकावला. जिह्यातून 75 खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत दापोली, लोटे, चिपळूण, लांजा, राजापूर तालुक्यातून 220 खेळाडू सहभागी झाले होते. 8 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात आयुष वैद्य, प्रीती बडे, आयुष शिंदे, श्लोक पाटील, मंथन शिंदे, श्राव्या जाधव, शौर्य शिंदे. 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात आदित्य रेन, आरुष जाधव, अथर्व पवार, अर्णव गोफणे, अन्वी गेम होनेकर, गायत्री करांडे, 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात ओम मेहता, शंकर मोरे, ऋषिकेश गुहागरकर, रुद्र घोसाळकर, आरव मांढरे, अथर्व गोरीवले, सुजाण तरडे, सार्थक राणे, आदर्श धानक, अस्मि लवांडे, स्वरा इंगवले, स्वराली रुके, गार्गी केळकर, आर्या चव्हाण, उत्कर्षा पाटील, नाविन्य सोनवाडकर, आदिती पवार, आयेशा चव्हाण यांनी सुवर्णपदक पटकावले.
14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात श्रवण कडव, ओम विचारे, साईप्रसाद वराडकर, पियुष कदम, आर्यन पवार, वैष्णव शिंदे, गीत बेलोसे, करण वाडकर, सुदर्शन चव्हाण, सम्राट महाडिक, अनिकेत पवार, भूषण शिर्के, रोहन माने, मुगदा शिंदे, आयुष्य काटकर, शर्वरी गोफणे, सौम्या अंजरलेकर, शर्वरी शिगवण, प्रांजल चव्हाण, सिमरन सुतार, स्नेहा भाटकर, भक्ती माळी, भूमी पाटील, 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात दयानंद सपकाळ, प्रथमेश जानराव, मिहीर कांबळे, सुहान बैकर, आशिष बेर्डे, जय शिर्के, ओम भागवत, तेजस वायकर, रोहन मोहिते, ओम शिंदे, दिव्या मेहता, श्रद्धा लोखंडे, ज्ञानदा सकपाळ, मितुषा साळुंखे, देवयानी देवघरकर, सलोनी पवार, प्रणया आखाडे, राखी थोरे, अपूर्व लिंगायत, मृणाली जाधव, प्रांजल राणे व अनन्या चव्हाण यांनी बाजी मारली.
17 ते 35 वर्षाखालील पुरुष व महिला गटात प्रथमेश चव्हाण, शुभम माटे, चिन्मय गुरव, प्रथमेश कदम, संकेत भालेराव, प्रसाद देवाडेगा, संदेश चव्हाण, ओम शिंदे, सार्थक माळी, संगम चव्हाण, सोनम खळे, सायली घोलप, सावनी रंगले, रूपाली आळकुटे, सेजल माने, विनीत कदम यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू बारामती येथे होणाऱया राज्यस्तरीय फाइट्स स्पर्धेसाठी जिल्हा संघात पात्र ठरले आहेत.
स्पर्धाप्रमुख पंच म्हणून सायली घोलप यांनी काम पाहिले. राज्य पंच प्रसाद देवाडेगा, प्रथमेश कदम, संगम चव्हाण, सुरेंद्र शिंदे, संदेश चव्हाण यांनी पंच म्हणून काम पाहिले. या खेळाडूंच्या यशाबद्दल जिल्हाध्यक्ष हर्षदीप सासणे, उपाध्यक्ष वैजेश सागवेकर, सचिव सुरेंद्र शिंदे, खजिनदार क्षितिज शिंदे, सदस्य जीवन कडू ,राजेश भागणे, श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानचे संस्थापक सुयश पाष्टे, प्राचार्य डॉ. एस. एस. अली, डॉ. अजित भोसले, अभिजीत घोसाळकर, प्रशांत सावंत आदींनी खेळाडूंचे कौतूक केले.