डॉक्टर, नर्स, पॅरॉमेडिक स्टाफ यांच्या टेनिंगचे प्रात्यक्षिक
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शनिवारी मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक घेतले. रूग्णालयातील स्टॉफला कोरोना बाधित रूग्ण आल्यानंतर कशा प्रकारे उपचार करायचे यांचे टेनिंग देण्यात आले आहे. या ट्रेनिंगचा सराव मॉकड्रिलच्या माध्यमातून करण्यात आला. सोमवार दि. 12 रोजी हे रूग्णालय सुरू होणार आहे.
शुक्रवारी जिल्हा कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटनानंतर दुसऱया दिवशी हे रूग्णालय रूग्णांच्या सेवेत सुरू होईल अशी चर्चा होती. मात्र शनिवारी या रूग्णालयात कोरोना बाधित रूग्णावर कशा पद्धतीने उपचार करण्यात येणार यांचे मॉकड्रिल करण्यात आले. या रूग्णालयात नियुक्त डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, वॉर्डबाय यांना गेल्या आठवडय़ात ट्रेनिंग देण्यात आले. हे ट्रेनिंग घेतल्यानंतर कशा प्रकारे रूग्णांना सेवा दिली जाणार आहेत. यांची चौकशी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केली. यावेळी आयसीयु वॉर्डमध्ये डमी पेंशट ठेवून स्टाफने उपचार करणार यांची माहिती दिली. कोरोना बाधित रूग्णांना उपचारासाठी दाखल झाल्यानंतर वेळेत ऑक्सिजन पुरवणे, व्हेंटिलेटरवर ठेवणे यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
यावेळी डॉ. चव्हाण म्हणाले, सोमवारपासून रूग्णालयातील एक वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. सात-आठ ऑक्सिजन बेडसाठी 1 डॉक्टर व स्टॉफ नियुक्त करण्यात येणार आहे. आयसीयुमध्ये चार-पाच बेडसाठी 1 डॉक्टर व स्टाफ यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. रूग्णांची गैरसोय होवू नये म्हणून योग्य ती दक्षता घेतला जात आहे. रूग्णसंख्या जशी वाढेल त्याप्रमाणे पुढील नियोजन करण्यात येणार आहे.