कृष्णात पुरेकर/कोल्हापूर
कोरोना आणि क्षयरोग असलेल्यांची जिल्हÎात तपासणी सुरू झाली आहे. दरम्यान, सीपीआर यंत्रणेवर होणारा ताण कमी होण्यासाठी जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रात साडेतीन लाखांचे डिजिटल एक्सरे मशिन दाखल झाले आहे. त्यासाठी यंत्रणा उभारण्यात येत आहे. नोव्हेंबरपासून येथे क्षयरोग रूग्णांचा ओपीडीमध्ये एक्सरे निघणार आहे. त्यामुळे इतरांना होणारा संसर्ग टाळला जाणार आहे. पेंद्राकडून आलेल्या 86 डिजिटल एक्सरेपैकी पहिल्या टप्प्यात 7 डिजिटल एक्सरे एकटÎा महाराष्ट्रात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
क्षयरोगमुक्त भारतासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रे सुरू आहेत. याद्वारे क्षयरोग तपासणी उपचार मोफत केले जात आहेत. अशा रूग्णांना यापुर्वी एक्सरेसाठी जिल्हा रूग्णालये, ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयांतील एक्सरे तपासणीवर अवलंबून रहावे लागत होते. त्यातून क्षयरोगाचा संसर्ग वाढत होता. तो टाळण्यासाठी प्रत्येक क्षयरोग केंद्राला डिजिटल एक्सरे देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2018 मध्ये घेतला. त्यानुसार प्रस्ताव मागवले होते. जिल्हा क्षयरोग केंद्राने त्यासाठी प्रस्ताव दिला. त्याला 27 मे 2020 रोजी मंजुरी मिळाली होती.
दरम्यान, केंदाने देशातील विविध राज्यांतील क्षयरोग केंद्रांकडून आलेल्या प्रस्तावाची छाननी केली. त्यातून पहिल्या टप्प्यात 86 क्षयरोग केंद्रांना रूग्णांच्या संख्येनुसार डिजिटल एक्सरे देण्यात आली आहेत. या प्रत्येक डिजिटल एक्सरे मशिन्सची किंमत साडेतीन ते साडेपाच लाखांपर्यत आहे. रूग्णांच्या टक्केवारीनुसार 34, 24 आणि 28 अशा 86 केंद्रांना ही मशिन मिळणार आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, सांगली, पुणे, नाशिक आणि सातारा येथील क्षयरोग केंदांना ती मिळणार आहेत. कोल्हापुरात सीपीआर हॉस्पिटलमध्ये जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र आहे. तेथे डिजिटल एक्सरे मशिन आले आहे. येथे सध्या सिबीनॅट यंत्रणा आहे. डिजिटल एक्सरेसाठी स्वतंत्र खोली केली आहे. तेथे एअरकंडिशन, स्टॅबिलायझर आदी यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यातील गोंदिया, अमरावती, हिंगोली, जालना, बीड, नांदेड, भिवंडी, वर्धा, चंद्रपूर, सातारा, उस्मानाबाद, बुलढाणा, अमरावती ग्रामीण, सोलापूर, ठाणे येथील क्षयरोग केंद्रांमध्ये 22 डिजिटल एक्सरे येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात आलेल्या 86 पैकी कोल्हापूरसह 7 ठिकाणी ती दाखल झाली आहेत.
डिजिटल एक्सरेमुळे क्षयरोग संसर्ग नियंत्रणात येणार
प्रिइन्स्टॉलेशन अँड डिजिटल एक्सरे आणि सीआर सिस्टीम असे याचे नाव आहे. याद्वारे रूग्णांच्या छातीचे एक्सरे काढले जाणार आहेत. यापुर्वी एक्सरेसाठी रूग्ण अन्यत्र गेल्याने संसर्गाचा धोका वाढला होता. आता क्षयरोग केंद्रांत ओपीडीत आलेल्या रूग्णांची तेथेच एक्सरेची सोय झाल्याने क्षयरोग नियंत्रणासाठी ते उपयुक्त ठरणार आहे, असे जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी सांगितले.