तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने 3 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये 3 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये दोन रुग्ण सारीचे तर एक संपर्कातील रुग्ण आहे. आज एक रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. उर्वरित 61 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शनिवारी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये दक्षिण सोलापूर मंद्रूप पोलीस लाईन 1 पुरुष, नवीन विडी घरकुल दक्षिण सोलापूर एक पुरुष, कवठा तांडा तालुका उत्तर सोलापूर एक पुरुष इतके रुग्ण आढळले आहेत. आज 28 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 3 पॉझिटीव्ह तर 25 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 32 अहवाल प्रलंबित आहेत. 73 रुग्णांपैकी 46 पुरुष 27 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे :
अक्कलकोट 8, बार्शी 18, माढा 1, माळशिरस 2, मोहोळ 4, उत्तर सोलापूर 2, सांगोला 3, पंढरपूर 7, दक्षिण सोलापूर 28 एकूण -73
कोव्हीड 19 तालुकानिहाय माहिती
होम क्वांरटाईन – 3125
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 1510
प्राप्त अहवाल- 1478
प्रलंबित अहवाल- 32
एकूण निगेटिव्ह – 1406
कोरोनाबाधितांची संख्या- 73
रुग्णालयात दाखल – 61
आतापर्यंत बरे – 6
मृत – 6