प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत होयबाचा गजर पहावयाला मिळाल़ा नेहमी वादळी होणाऱया निजोजनच्या बैठकीत सर्वांनीच अळीमिळी गुपचिळी केल्याने अधिकारीवर्गाने देखील बैठक रेटून नेल़ी या बैठकीत जिह्याच्या 211 कोटींच्या विकास आराखडय़ाला मंजुरी देण्यात आल़ी
पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी नियोजनची बैठक पार पडल़ी यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, भास्कर जाधव, राजन साळवी, ज़ि प. अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, जिल्हाधिकारी ब़ी एन पाटील, ज़ि प. मुख्याधिकारी ड़ॉ इंदुराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड तसेच विविध विभागांचे अधिकारी, समित्यांचे सदस्य उपस्थित होते. ़
जिह्यामध्ये पूरस्थिती, पीडितांची मदतीपासून झालेली उपेक्षा, पूरस्थितीसाठी जबाबदारी निश्चित करणे, कोरोनाच्या दुसऱया लाटेत जिह्याची झालेली वाताहत, कोयनेच्या अवजलाचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, लसीकरणासंबंधीचे प्रश्न आदी मुद्दे बैठकीत चर्चेला येणार होत़े यामुळे विविध मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरले जाईल व अधिकाऱयांना जाब विचारण्यात येईल, असे म्हटले जात होत़े प्रत्यक्षात बैठकीत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱयांच्या हो ला हो म्हणत बैठक रेटून नेल़ी या दृष्टीकोनाचे अधिकाऱयांनाही आश्चर्य वाटल़े
जिल्हा नियोजनच्या बैठकीत 2021-22 साठी 210 कोटी 60 लाख 81 हजार रूपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आल़ा 2021-22 च्या चालू आर्थिक वर्षासाठी 250 कोटी निधी अर्थसंकल्पीत आह़े त्यापैकी 72 कोटी कोटी 99 लाख 57 हजार निधी प्राप्त झाल़ा त्यामधील 28 कोटी 21 लाख 91 हजारांचा निधी वितरित करण्यात आला. कोविडसोठी 75 कोटी नियतव्यय अनुज्ञेय करण्यात आला आह़े विषेश घटक योजनेचा 2020-21 मध्ये 17 कोटी 81 लाख निधी प्राप्त असून त्यापैकी 17 कोटी 98 लाख 65 हजार खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री ऍड. परब यांनी दिल़ी
आदिवासी उपाययोजना क्षेत्राबाहेरील योजनेचा 2020-21 मध्ये 1 कोटी 8 लाख 91 हजार निधी प्राप्त निधीपैकी 1 कोटी 4 लाख 96 हजार खर्च झाला आह़े 2021-22 साठी 1 कोटी 8 लाख 91 हजार निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आह़े 21 व 22 जुलै रोजी आलेल्या पूरस्थितीसाठी 4 कोटी 56 लाख 81 हजार रूपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल़ी
कोविडमध्ये 13 कोटींहून अधिक खर्च
कोरोना काळात जिल्हा प्रशासनाकडून 13 कोटी 95 लाख 47 हजार रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आह़े यामध्ये प्रयोगशाळा, व्हेंटीलेटर, ऑपरेशन थिएटर, डय़ुरा सिलिंडर आदीवर खर्च करण्यात आला आहे.
नियोजनच्या बैठकीत राणेंच्या वक्तव्याचा निषेध
जिल्हा नियोजनच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आल़ा यावेळी ऍड. अनिल परब म्हणाले की, आक्रमकता हाच शिवसेनेचा डीएनए आह़े राणे यांनी केलेले वक्तव्य हीच भाजपाची संस्कृती आहे का, हे त्यांनी जाहीर कराव़े