प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये मंगळवारी अचानक नागोबाने इंन्ट्री घेतल्याने कर्मचाऱयांची एकच तारांबळ उडाल़ी दरम्यान काही वेळातच आपण चुकीच्या ठिकाणी आल्याची जाणिव या नागोबांना झाल़ी मात्र बाहेर जाण्याचा मार्ग सापडत नसल्याने इमारतीमध्येच हे नागोबा इकडून तिकडे फिरत राहिल़े यावेळी सर्पमित्राला बोलाविण्यात आले असता त्याने या नागोबांना सुखरूप पकडून जंगलात सोडल़े
नेहमी वकिल, आरोपी, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस यांचा वावर असणाऱया न्यायालयात मंगळवारी नाग दिसून आल़ा चाफ्याखालील 4 थे सहदिवाणी न्यायाधिश यांच्या इमारतीमध्ये हा साप घुसल़ा तेथील ओंकार तोडणकर या कर्मचाऱयाच्या ही बाब निदर्शनास आल़ी नागोबांना पाहताच अनेकांना चांगलाच घाम फुटल़ा त्यातच हे नागोबा रागाने जोरजोरात फुत्कार टाकत असल्याने काय करावे हे कर्मचाऱयांना समजेनासे झाल़े नागोबांचे रौद्र रूप पाहून सर्पमित्राला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आल़ा सर्पमित्राने काही क्षणातच या नागोबांना प्लास्टिकच्या बाटलीमध्ये बंद केल़े यामुळे तासभर जीव मुठीत धरून असलल्या कर्मचाऱयांनी सुटकेचा निश्वास सोडल़ा चाफ्याखालील इमारतीच्या समोरील भागामध्ये झाडी आह़े पावसामुळे हा आश्रयासाठी हे नागोबा इमारतीमध्ये आले असण्याची शक्यता सर्पमित्रांने वर्तवली आह़े मात्र कामाच्या तणावात असलेल्या न्यायालयाच्या कर्मचाऱयांमध्ये अगंतूकपणे आलेल्या या पाव्हण्याने चांगलीच धकडी भरवल़ी