जिल्हा पंचायत सीईओ डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी केली पाहणी
प्रतिनिधी/ बेळगाव
यावषी मंजूर झालेल्या विकास निधीतून जिल्हा पंचायत कार्यालयात विविध विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत. जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी मंगळवारी स्वत: संपूर्ण जिल्हा पंचायत कार्यालयासह परिसराची पाहणी केली. तसेच अधिकारी वर्गास आवश्यक सूचना केली. कार्यालयात येणाऱया दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्तींना सोयीचे ठरावे यासाठी रॅम्प निर्मितीसह कार्यालयात लिफ्टची सोय करण्यात यावी. याबाबत कृती आराखडा बनविण्यात यावा, अशी सूचनाही सीईओनी यावेळी अधिकाऱयांना केली.
मंगळवारी सकाळी त्यांनी संपूर्ण कार्यालयाची तसेच कार्यालय आवारात असणाऱया जि. पं. कॅन्टिन, पार्किंग, रेकॉर्ड रूम आणि खुल्या जागेची पाहणी केली. खुल्या जागेचा योग्य वापर करण्यात यावा. यासाठी कार्यालय आवारात असणाऱया रेकॉर्ड रूमचा वापर करण्यात यावा. जिल्हा पंचायत कार्यालयातील काही कक्ष या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावेत. या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. वाहन पार्किंगसाठी योग्य व्यवस्था करण्याबरोबरच स्वच्छता गृहांची निर्मिती करण्यात यावी. सध्या जि. पं. कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर रेकॉर्ड रूमसाठी स्वतंत्र खोली बांधण्यात आली आहे. याबरोबरच उपलब्ध जागेचा योग्यप्रकारे वापर करण्यात यावा, याशिवाय कार्यालयात येणाऱया वयोवृद्ध तसेच दिव्यांगांच्या सोयीसाठी रॅम्पची निर्मिती करण्यात यावी, तसेच पहिल्या मजल्यावर येण्यासाठी लिफ्टची सोय करण्यात यावी. याबाबत लवकरच कृती आराखडा बनवून देण्यात यावा, अशी सूचना सीईओ डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी अधिकारी वर्गास केली आहे. याप्रसंगी जिल्हा पंचायतचे कार्यदर्शी एस. बी. मुळ्ळोळी, मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी, व्यवस्थापक मुरगामठ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.