सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी-
विद्यमान जिल्हा परिषदेच्या सदस्यांची पाच वर्षातील आखरेच्या सर्वसाधारण सभेपुर्वी शिवसेना सदस्यांनी निषेध आंदोलन केले जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरुन जी प सभागृहापर्यत मोर्चा काढला यावेळी जी प मधील घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे आशा घोषणा देत निषेधाचे फलक परिधान करून निषेध केला वॉटर प्युरीफायर खरेदी घोटाळा,राजस्थान अभ्यास दौरा, एलईडी टीव्ही घोटाळा आशा विविध घोटाळ्याच्या चौकशी होण्याच्या मागणीचे फलक लावले होते
शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब,संजय पडते,प्रदीप नारकर, अमरसेन सावंत,राजेश कविटकर ,संजय आंग्रे,राजन मुळीक,नितीन शिरोडकर,मायकल डिसोझा,संपदा देसाई,राजलक्ष्मी डीचवलकर ,स्वरुपा विखाळे ,वर्षा पवार,वर्षा कुडाळकर, पल्लवी झिमाळ,रोहिणी गावडे हे शिवसेना सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते