प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अनुसुचित जमाती प्रवर्गातील विशेष भरती मोहिमेंतर्गत आरोग्य सेवक (महिला), कनि÷ सहाय्यक (लिपीक), परिचर या संवर्गातील पद भरतीसाठी 11, 12 व 13 जानेवारी 2020 रोजी परीक्षा घेण्यात येणार होत्या. तथापि या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून आता या परीक्षा पुढील तारखाना होणार आहेत. आरोग्य सेवक (महिला) पदासाठी 22 जानेवारी 2020 रोजी, कनि÷ सहाय्यक (लिपीक) पदासाठी 23 जानेवारी रोजी आणि परिचर पदासाठी 24 जानेवारी रोजी या प्रमाणे परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी प्रवेशपत्रे यापूर्वीच पाठविण्यात आली असून सदरची प्रवेशपत्रे ही ग्राह्य धरण्यात येणार आहेत. परीक्षेच्या ठिकाणामध्ये काही बदल असल्यास किंवा परीक्षेबाबत काही सुधारित सूचना असल्यास https://zpsindhudurg.maharashtra.gov.in तसेच https://sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.