प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा परिषदेच्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्यासह सर्वच विषय समित्यांच्या पदाधिकाऱयांसह जिल्हा परिषद सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल दि. 20 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे नव्याने कारभार प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे दि. 21 रोजी जाणार आहे. जिह्यातील 11 पंचायत समित्यांचा कार्यकाळ दि. 13 रोजी संपत असून दि. 14 रोजी प्रशासक म्हणून कार्यभार हा बीडीओंकडे जाणार आहे. हा कारभार चार महिने किंवा निवडणुका होऊन नव्याने पदाधिकारी येईपर्यंत आहे, असा आदेश काढण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान सर्वच सदस्यांसह पदाधिकाऱयांचा कार्यकाल हा पाच वर्षाचा संपल्याने निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार प्रशासक नियुक्तीचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या सुचनेनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी परिपत्रक सर्वच पंचायत समित्यांना काढले आहे. त्यानुसार जिह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापतीपदाची मुदत ही दि. 13 रोजी संपत आहे. दि. 14 पासून गटविकास अधिकाऱयांच्या हाती कारभार जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱयांचा कार्यभार हा दि. 20 रोजी संपणार आहे. व दि. 21 पासून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे प्रशासक म्हणून बसणार आहे. प्रशासक म्हणून चार महिन्यांपर्यंत किंवा जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापतीपदे निवडणुकीद्वारे भरेपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत हा कार्यकाल असणार आहे.
विद्यमान पदाधिकाऱयांचा कार्यकाळ कोरोनामध्येच व्यस्त
विद्यमान पदाधिकाऱयांची निवड झाली अन् चार महिन्यामध्ये कोरोनाची एन्ट्री झाली. कोरोना काळातही या पदाधिकाऱयांनी काम केले. ज्यावेळी कोरोना कमी झाला तेव्हा कार्य काळ संपला गेला.