अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 5 मार्च 2022, सकाळी 11.00
● काहीसे निर्बंध शिथिल केल्याने दिलासा
● जिल्ह्यात नव्याने 19 जण बाधित
● सर्वच तालुक्यातील एक आकडे
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.38 वर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात आढळून येणाऱ्या बाधितांवर चांगले उपचार केले जात आहेत. ठणठणीत बरे केले जात आहेत. मात्र, जिल्हा पूर्णपणे निर्बंधमुक्त केव्हा होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. काहीसे निर्बंध शिथिल केले आहेत. शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात जिल्ह्यातील नव्याने 19 जण बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 1.38 वर आला आहे.
जिल्ह्यात पूर्णपणे निर्बंध हटणार कधी?
सध्या कोरोना बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या ही 20 च्या खाली आहे. मृत्युदर ही शून्याच्या खाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकतीच काहीशी शिथिलता आणली आहे. ती पूर्णपणे निर्बंधमुक्त असायला हवी होती. काहीसे निर्णय शिथिल केल्याचा दि.3रोजी जिल्हाधिकारी यांनी अध्यादेश काढला आहे. त्यात लसीकरण हा मुद्दा नमूद केला आहे. तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना जागेच्या 50 टक्के परवानगी दिली आहे. 1 हजार पेक्षा जास्त असतील तर तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ऑफ लाईन शाळा सुरू राहतील असेही नमूद केले आहे. शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल, बार, क्रीडा संकुल, जिम, स्पा, पर्यटन स्थळे, नाट्यगृह हे 100 टक्के क्षमतेने काम करण्यास परवानगी दिली आहे. सरकारी व खासगी कार्यालयात पूर्ण क्षमतेने काम करण्यास मुभा दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुके एक आकडी
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील परिस्थिती आता दिलासादायक अशी आहे. प्रत्येक तालुक्यातील नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या ही दहाच्या खाली आलेली आहे. त्यामध्ये कराड 8, खंडाळा 1, खटाव 2, कोरेगाव 1, माण 2, पाटण 1, सातारा 4 असे 19 जण आढळून आले आहेत.
शनिवारी
नमुने-1377
बाधित-19
शनिवारपर्यंत
नमुने- 25,57,024
बाधित-2,79,097
मृत्यू-6,679
मुक्त-2,71,621