शासकीय नियमांच्या पालनांचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पोलिसांनी जिल्हय़ात जागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. तपासनाक्मयांवर वाहने अडवून तपास करण्याबरोबरच नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, याची पडताळणी करण्यात येत आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. तपासनाक्मयावर वाहने अडवून चौकशी करण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझरचा वापर होतो की नाही, याची पडताळणी करण्यात येत आहे. संबंधितांना मास्क वापरण्याची सूचना करण्यात येत आहे.
पोलीस वाहनातून ग्रामीण भागात जागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ध्वनिक्षेपकावरून नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरात बेळगाव जिल्हय़ातही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. बाजारपेठेत व गर्दीच्या ठिकाणी नियम पाळले जात नाहीत. सरकारी यंत्रणेकडून वारंवार सूचना देऊनही मास्क, सॅनिटायझरचा वापर व्यवस्थित होत नाही.
तिसऱया लाटेचा धोका असल्यामुळे पोलीस दल पुन्हा कामाला लागले आहे. ग्रामीण भागात जनजागृती मोहीम हाती घेतल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले. बेळगाव बाजारपेठेतील स्थिती पाहता मास्क वापरणाऱयांची संख्या कमी झाली आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. सरकारवर पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.