पोलीस भरतीसाठीच्या परीक्षेत कॉपीसाठी अद्ययावत यंत्रणेचा वापर : इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या घबाडासह बारा जणांना अटक
प्रतिनिधी /बेळगाव
रविवारी नागरी पोलीस भरती प्रक्रियेसाठी झालेल्या लेखी परीक्षेत अनेक गैरप्रकार चालले. बेळगाव शहरात परीक्षेत गैरप्रकार करणाऱया बारा जणांना जिल्हा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळून मोबाईल, मास्टरकार्ड डिव्हाईस, ब्ल्यू टूथ, टॅब, लॅपटॉप, कार आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. जिल्हय़ाचे पोलीस येऊन शहरात कारवाई करेपर्यंत शहर पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली नाही का? की माहिती असूनही त्याकडे कानाडोळा करण्यात आला? असा संशय निर्माण झाला आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सीईएन पोलीस ठाण्याचे निरीक्षक वीरेश दोडमनी, उपनिरीक्षक संगमेश होसमनी, डीसीआयबीचे पोलीस उपनिरीक्षक बी. जे. पाटील व त्यांच्या सहकाऱयांचा समावेश असलेल्या विशेष पथकाने माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात ही कारवाई केली. जिल्हा पोलिसांच्या या कारवाईने बेळगाव पोलीस संशयाच्या भोवऱयात सापडले आहेत.
पोलीस भरतीसाठीच्या परीक्षेत सरदार्स हायस्कूल व वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम हायस्कूलमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी खडेबाजार व कॅम्प पोलिसात दोन स्वतंत्र गुन्हेही दाखल झाले. मात्र, जिल्हा पोलिसांनी या गैरप्रकारांच्या मुळावरच घाव घातला. या कारवाईने गैरप्रकारात गुंतलेल्या टोळीतील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
परीक्षेत गैरप्रकारासाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर झाला आहे. त्याचे मूळ कुठे आहे?
याची माहिती मिळवत जिल्हा पोलिसांनी माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील रामतीर्थनगर परिसरात असलेल्या एस. एस. डेकोरेटर व इव्हेंट प्लॅनर कार्यालयाजवळ छापा टाकून बारा जणांना अटक केली आहे. याच परिसरात बसून इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या माध्यमातून परीक्षार्थींना उत्तरे सांगितली जात होती. त्यावेळी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
विशेष पोलीस पथकातील अधिकाऱयांना पाहताच या टोळीतील गुन्हेगारांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून मोठय़ा प्रमाणात डिव्हाईस जप्त करण्यात आले आहेत. दोन परीक्षा केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या माध्यमातून गैरप्रकार करण्यात येत असल्याची माहिती मिळूनही शहर पोलिसांनी त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी का प्रयत्न केला नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहराच्या सुरक्षेलाही धोका
अद्ययावत यंत्रणेचा वापर करून परीक्षेत गैरप्रकार करण्यात येत आहेत. रामतीर्थनगरसारख्या शहरापासून दूरवरील अंतरावरून ही सर्व यंत्रणा हाताळण्यात आली. आजच्या घडीला जर गुन्हेगार एवढे सक्रिय आणि आधुनिक बनून एकमेकांच्या संपर्कात राहात असतील तर उद्याला शहरात एखादा मोठा घातपात करण्यासाठी हीच यंत्रणा वापरली जाऊ शकते. या इतक्मया धोकादायक यंत्रणेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे संपूर्ण शहराच्या सुरक्षेकडेच कानाडोळा करण्याचा प्रकार आहे, असे सामान्य जनतेमधून बोलले जात आहे.
जिल्हा पोलिसांनी करून दाखवले
या कारवाईत 33 मोबाईल संच, 9 मास्टरकार्ड डिव्हाईस, 19 ब्ल्यू डिव्हाईस, 3 टॅब, 1 लॅपटॉप, 1 प्रिंटर, 1 इको स्पोर्ट्स कार, 3 मोटारसायकली आदी जप्त करण्यात आले आहे. संबंधित बारा जणांविरुद्ध माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पोलीस भरतीसाठी होणाऱया प्रत्येक परीक्षेच्यावेळी गैरप्रकार होतात. केवळ बेळगावच नव्हे तर राज्यातील विविध जिल्हय़ात असे प्रकार घडले आहेत. जे शहर पोलिसांना जमले नाही ते जिल्हा पोलिसांनी करून दाखविले आहे.
पोलीस भरतीसाठीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रकार सुरूच
तरुणीसह चौघाजणांविरुद्ध एफआयआर दाखल, पुढील तपास सुरू
बेळगाव : रविवारी शहरातील 21 परीक्षा केंद्रांवर नागरी पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेत दोन परीक्षा केंद्रांवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून एका तरुणीसह चौघाजणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
खडेबाजार व कॅम्प पोलिसात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या परीक्षेत कॉपी करणारे परीक्षार्थी गोकाक तालुक्मयातीलच आहेत. यापूर्वीही सलग तीन वेळा गोकाक तालुक्मयातील परीक्षार्थींची धरपकड झाली होती.
या अगोदर डोक्मयावर थर्मोकोलचे तुकडे ठेवून त्याच्यावर विग घालून शारीरिक चाचणी परीक्षेवेळी उंची वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक प्रकार घडले होते. याबरोबरच अनेक परीक्षात डमी उमेदवाराने परीक्षा दिल्याची उदाहरणे आहेत. केवळ बेळगावच नव्हे तर राज्यातील वेगवेगळय़ा परीक्षा केंद्रांवर गोकाक तालुक्मयातील तरुण पकडले गेले आहेत.
येथील सरदार्स हायस्कूलमध्ये रविवारी झालेल्या लेखी परीक्षेत मसगुप्पी, ता. गोकाक येथील लक्ष्मण काळाप्पा अशीरोट्टी (वय 27) हा कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेऊन पेपर लिहीत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खडेबाजार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर भादंवि 420 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला.
दुसरी घटना येथील सीपीएड् कॉलेज मैदानाजवळील वनिता विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील परीक्षा केंद्रावर घडली आहे. सरस्वती अर्जुन पुजेरी (वय 23) रा. तिगडी, ता. मुडलगी हिला ताब्यात घेऊन तिच्यावर कॅम्प पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तिला इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पोहोचविणारे हालाप्पा पुजेरी, रा. तिगडी, ता. मुडलगी, व लक्ष्मण बंडी, रा. गोकाक या दोघाजणांवरही भादंवि 417, 420 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.