प्रतिनिधी/ वाई
पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी वाई पोलिस ठाण्यात सात महिन्या पुर्वी सहाय्यक फौजदार विजय शिर्के किरण निंबाळकर सोमनाथ बल्लाळ महिला पोलिस सोनाली माने या चार जणांना सोबत घेऊन डिबी पथक तयार केले सात महिन्यात या पथकाने अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले तसेच वाई शहरासह हद्दीतील गावांन मधील अवैध धंदे वेश्या व्यवसायांन वर धाडी टाकून बंद केले अनेक चोरीचे गुन्हे अवघ्या य24 तासात उघडकीस आणुन गुन्हेगारांना गजाआड करण्यास हे पथक यशस्वी झाल्याच्या नोंदी वाई पोलिस ठाण्यात आढळून येतात वाई पोलिस ठाण्यातील डिबी पथकाने चमकदार केलेल्या कामगीरी मुळे सातारा पोलिस दलाची ऊंची आणी समाजात विश्वासार्था वाढविण्या साठी केलेल्या कामाची दखल घेऊन पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे पथकातील पोलिस उपनिरीक्षक संजय मोतेवार सहाय्यक फौजदार विजय शिर्के किरण निंबाळकर श्रावण राठोड सोमनाथ बल्लाळ महिला पोलिस सोनाली माने यांचा दि.13 रोजी सातारा येथे झालेल्या क्राईम मिटींगमध्ये जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बंसल यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला .सविस्तर वृत्त असे कि 30 मे रोजी किसनवीर कॉलेज परिसरातील हॉटेल सनई शेजारी तक्रारदार यांचे मंडप साहित्याचे गोडावुन आहे त्या ठिकाणी मिनी ट्रक व त्यावर पाच लाख रुपये किमतीचा एक जनरेटर असा उभा असताना त्या मध्य रात्री अज्ञात चोरटय़ांनी डुप्लीकेट चावीचा वापर करुन जनरेटर सह माल ट्रक लंपास केला होता याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली चोरीचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तात्काळ हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्या साठी डिबी पथका कडे सुपूर्त केला या पथकाने तपास गतीमान करण्या साठी व आरोपी पर्यंत पोहचण्या साठी मंडप कॉट्रेक्टर बनुन वाई सुरूर वेळे शिरवळ खंडाळा जोशीविहीर पाचवड आनेवाडी टोलनाका येथील सी सी कॅमेरेंचे फुटेल तपासणी करीत करीत आरोपीचा माघ काढत हे पथक एक हजार कि.मी.चे अंतर कापत नगर जिह्यात पोहचले तेथील मंडप कॉट्रेक्टर असणार्या पर्यंत पोहचुन जुना जनरेटर विकत घ्यायचा आहे असे सांगून हे पथक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आरोपी पर्यंत पोहचुन मीनीट्रकसह आरोपी ताब्यात घेण्यास अखेर यश आले हाच गुन्हा
अवघ्या 24 तासात उघडकीस आणल्यानेच पथकाला शाबासकीची थाप म्हणून जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला .