बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्याचे पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबर्गी हे कोरोना पॉजिटिव्ह झाले आहेत. बेळगाव पोलीस दलातील या मोठ्या अधिकाऱ्यांला देखील कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.
जे कुणी आपल्या संपर्कात आले आहेत त्यांना होम क्वारंटाइन व्हा असे आवाहन करत अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख आपले काम सांभाळतील असे त्यांनी सांगितले आहे
पोलीस दलातील व्हाट्स अप्प ग्रुप मध्ये स्वतः पोस्ट टाकून आपणाला कोरोना झाल्याची माहिती दिली असून संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केलं आहे.
अतिरिक्त पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आता काम पाहणार आहेत.