श्री चषक निमंत्रितांची टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
श्री स्पोर्टस् खडक गल्ली आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात जिल्हा पोलीस प्रमुख संघाने फौजी इलेव्हन संघाचा 5 धावांनी पराभव करून श्री चषक पटकाविला.
व्हॅक्सीन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या श्री चषक निमंत्रितांच्या स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात हेस्कॉम संघाने 6 षटकात 8 बाद 58 धावा केल्या. त्याला उत्तर देताना जिल्हा पोलीस प्रमुख संघाने 5.3 षटकांत 2 बाद 60 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. 3 गडी बाद करणाऱया दुर्गाप्पा याला सामनावीर पुरस्कार देण्यात
आला.
दुसऱया उपांत्य सामन्यात पोस्टमन संघाने 8 षटकांत 4 बाद 41 धावा केल्या. त्याला उत्तर देताना फौजी इलेव्हन संघाने 6 षटकांत 1 बाद 46 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. 34 धावांत 2 गडी बाद करणाऱया उमेश (फौजी) याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
अंतिम सामन्यात जिल्हा पोलीस प्रमुख संघाने 6 षटकांत 5 बाद 44 धावा केल्या. त्याला उत्तर देताना फौजी संघाने 6 षटकांत 7 गडी बाद 39 धावांच केल्या. केवळ 5 धावांनी हा सामना डीएसपी संघाने जिंकला.
मंगळवारचे सामने : 1) फॅन्को स्पोर्टस् वि. सरदार्स वॉरियर्स सकाळी 8.30 वाजता. 2) इंडियन बॉईज हिंडलगा वि. अनगोळ स्टार सकाळी 10.30 वाजता, 3) डेपो मास्टर्स वि. मराठा स्पोर्टस् ग्रामीण दुपारी 12.00 वाजता. 4) एस.आर. स्पोर्टस् वि. अतिक यमकनमर्डी स्पोर्टस् दुपारी 1.30 वाजता. 5) पहिल्या सामन्यातील विजेता वि. दुसऱया सामन्यातील विजेता 3.30 वाजता.