प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा प्रशासन व कन्नड आणि सांस्कृतिक खात्यातर्फे कट्टीमनी सभागृहात मंगळवारी भगिरथ जयंती साजरी करण्यात आली.कोविडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साधेपणाने पार पडला. कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री व बेळगाव जिल्हा उप्पार संघाचे अध्यक्ष जे. एस. उप्पार यांनी भगिरथ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी संघाचे कार्यवाह बी. व्ही. मेलमट्टी, उपाध्यक्ष एन. आर. लातूर, खजिनदार बालराज, रवी उप्पार व खात्याचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.