प्रतिनिधी / बेळगाव
हरितक्रांतीचे नेते डॉ. बाबू जगजीवनराम यांची 114 वी जयंती संगमेश्वर येथील बाबू जगजीवनराम उद्यानामध्ये साजरी करण्यात
आली.
जिल्हा प्रशासन आणि विविध दलित संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी हरिषकुमार यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून जगजीवनराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. जगजीवनराम हे देशाला मिळालेले अनमोल रत्न होते, असे ते म्हणाले. यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले यांचेही भाषण झाले. याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी दर्शन एच. बी., महानगरपालिकेचे आयुक्त जगदीश के. एच., तसेच मल्लेश कुरंगी, यल्लाप्पा हुदली, दुर्गेश मेत्री, सिद्राय मेत्री, बसवराज रायगोळ, बाबू पुजारी, सिद्दाप्पा कांबळे आदी उपस्थित होत.
आरपीडी कॉलेजमध्ये बाबू जगजीवनराम जयंती साजरी
एसकेई संस्थेच्या राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे भारताचे थोर स्वातंत्र्यसेनानी व माजी संरक्षणमंत्री स्व. बाबू जगजीवनराम यांची जयंती कॉलेजच्या पद्मश्री पु. ल. देशपांडे खुल्या रंगमंचावर सोमवारी साजरी करण्यात आली. कॉलेजच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिकारी प्रा. विजयकुमार पाटील यांनी स्वागत करून बाबूजींच्या कार्याची माहिती सांगितली. प्राचार्या डॉ. एस. ए. नाईक, प्रा. विजयकुमार पाटील, अधीक्षक एम. एस. चिक्कमठ यांनी बाबूजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
देवेंद्र जिनगौडा शाळेत बाबू जगजीवनराम जयंती साजरी
शिंदोळी (ता. बेळगाव) येथील देवेंद्र जिनगौडा इंग्रजी व कन्नड माध्यम शाळेमध्ये बाबू जगजीवनराम जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम बाबू जगजीवनराम यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका विजयलक्ष्मी पाटील यांनी पुष्प अर्पण करून पूजा केली. त्याचबरोबर बाबू जगजीवनराम यांच्या जीवनशैलीविषयी माहिती सांगितली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपमुख्याध्यापिका रोशनी रॉड्रिग्ज, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे बाबू जगजीवनराम जयंती साजरी
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलमध्ये बाबू जगजीवनराम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक शिवाजीराव बी. पाटील यांनी प्रतिमेचे पूजन करून बाबू जगजीवनराम यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. याप्रसंगी सहशिक्षक ए. बी. पाटील, एस. एच. पाटील, एस. आर. कम्मार, जे. डी. बिर्जे, आर. ए. देसूरकर, एस. एन. पाटील, पी. के. पाटील, के. बी. रंगाई, के. एस. सुळगेकर, संभाजी देसाई, अनिता गुंडोजी, नीता पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक पी. एम. पाटील यांनी केले. आभार ए. पी. नाकाडी यांनी मानले.