बेळगाव/ प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनातर्फे कलबुर्गी गुलबर्गा जिल्हा येथे आयोजित राज्यस्तरीय आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघाची निवड चाचणीं सुभाष लेले मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
गुलबर्गा (कलबुर्गी) येथे 28 ते 30 डिसेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघाची निवड चाचणीचे आयोजित केली आहे. उद्या सोमवार दि. 14 डिसेंबर रोजी लेले मैदानावर सायंकाळी 4 वाजता निवड चाचणीला सुरूवात होणार आहे. इच्छुक खेळाडूंनी वेळेत हजर रहावे, असे आवाहन सचिव अमित पाटील यांनी कळविले आहे.