तिळगुळाने गोडवा वाढवत चर्चा
वारणानगर / प्रतिनिधी
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत कोणती भूमिका घ्यायची याचे सर्वाधिकार आ. विनय कोरे यांना दिले असून आ. कोरे जी भूमिका घेतील ती भाजपासह मित्रपक्षाना मान्य असेल असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यानी पत्रकारांना सांगीतले.
वारणानगर ता. पन्हाळा येथे आ. विनय कोरे यांच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकात पाटील यानी भेट घेतल्यावर त्यानी पत्रकारांना माहिती दिली. ते पुढे म्हणाले आ. प्रकाश आवाडे यांचा तसेच प्रक्रीया गट, शाहूवाडी, आजरा संस्था गटात आमच्या जागांचा धोका देवून झालेला पराभव आम्हाला धक्का देणारा ठरला आहे असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सहकारातील जाणकार, अभ्यासू अशी ओळख आ. विनय कोरे यांची आहे त्यांच्या अनभुवाचा लाभ बँकेला होईल यासाठी सत्ताधारी गटाने आ. विनय कोरे यांना अध्यक्षपदाची संधी दिली पाहीजे. भाजपासह मित्रपक्ष जनसुनज्य,आ. आवाडे, महाडिक गट यांची सामूहिक ताकद जिल्हा बँकेला सात जागा निवडून येतील एवढी आहे शिवसेनेला सोबत घेवून स्वतंत्र पॅनेल केले असते तर जिल्हा बँकेत दहाच्यावर आमच्या जागा येवून सत्ता आमची आली आसती. मुबई बँकेत ज्या प्रमाणे गठबंधन केल्यावर भाजपाची सत्ता आली पुन्हा आघाडी करून एका मताने पराभव झाला भाजपाला सत्तेपासून बाजूला व्हावे लागले तसा प्रयोग येथे देखील होऊ शकेल परंतु सद्या आमचे संख्याबळ तीन आहे त्यामुळे चार दिवसात काही घड़ामोडी घडतील हे पाहून काय निर्णय घ्यायचा हे आ.विनय कोरे ठरवतील असे आ. चंद्रकांत पाटील यानी सांगीतले.
बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी गटासोबत आम्ही गेलो आणि याच सत्ताधारी गटाने आमच्या जागा पाडण्यासाठी प्रयत्न केले ते आज यशस्वी झाले तरी याचे दिर्घकालीन परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात यापुढे होतील असेही आ. चंद्रकांत पाटील यानी सांगीतले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.
जिल्हा बँकेतील पतसंस्थास्था, प्रक्रिया गटात झालेला पराभव जिव्हारी लागल्याची नाराजी नतंर आ. विनय कोरे यानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मंत्री ना. हसन मुश्रीफ यांना यापुढील राजकारणात आम्हाला गृहीत धरू नये असे खडे बोल सुनावले. आज लगेचच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यानी संक्रातीच्या निमीत्ताने तिळाचे लाडू आ. कोरे यांना देत आजच्या चर्चेतील गोडवा वाढवत त्यांना बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सर्वाधिकार दिले. यावेळी आ. कोरे यांच्या कार्यालयात पत्रकारासह उपस्थित सर्वानांच तिळगुळाचे लाडू देत संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.