21 पैकी 17 जागा सत्ताधाऱ्यांना तर चार परिवर्तन आघाडीला
कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी आघाडीवरती विश्वास टाकला आहे. 21 पैकी 17 जागा सत्ताधाऱ्यांना तर चार जागा परिवर्तन आघाडीला मिळाल्या आहेत. यामध्ये काही उमेदवारांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला आहे. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्यांदा संस्था गटातील मतमोजणी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता आजरा संस्था गटातील सत्ताधारी आघाडीचे सुधीर देसाई 57 मध्ये घेत विजयी झाले. त्यांनी विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा पराभव केला. त्यांना 48 मते मिळाली भुदरगड मधून रणजीत पाटील गडहिंग्लज मधून विद्यमान संचालक संतोष पाटील विजय झाले. येथे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांचा नामुष्कीजनक पराभव झाला. त्यांना केवळ सहा मते मिळाली.
जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या शिरोळ तालुक्यात पुन्हा एकदा आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी 98 मते घेत विजय मिळवला. तर गणपतराव पाटील यांना 51 मते मिळाली. असाच धक्कादायक निकाल शहूवाडी मतदारसंघात लागला. शिवसेनेचे रणवीर गायकवाड 66 मते घेत विजयी झाले. येथे विद्यमान संचालक सर्जेराव पाटील यांचा पराभव झाला. त्यांना 33 मते मिळाली. तर अपेक्षेप्रमाणे विनय कोरे 204 मध्ये घेत विजयी झाले.
सर्वांचे लक्ष लागलेल्या प्रक्रिया गटात सत्ताधारी आघाडीत जबरदस्त धक्का बसला. येथे परिवर्तन आघाडी चे खासदार संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील मोठ्या फरकाने विजय झाले. त्यापाठोपाठ पतसंस्था गटातील सत्ताधारी गटाचा पराभव झाला. येथे आमदार प्रकाश आवाडे यांचा अर्जुन अबीटकर यांनी पराभव केला. येथून मात्र पुढील सर्व जागा सत्ताधारी गटास ताब्यात ठेवण्यात त्यांना यश आले. इतर संस्था गटातून प्रताप माने इतर मागासवर्गीय गटातून विजयसिंह माने भटक्या जमाती गटातून स्मिता गवळी इतर मागासवर्गीय गटातून आमदार राजू आवळे तर महिला प्रतिनिधी गटातून निवेदिता माने आणि श्रुतिका काटकर मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.