प्रतिनिधी/ बांदा
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत महाविकास आघाडीला धूळ चारली. या विजयाचा बांद्यात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.भाजपयुमो तालुकाध्यक्ष मकरंद तोरसकर, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत,तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर,ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर मांजरेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते