कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्हा बँकेसाठी आज सकाळपासूनच चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथे मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी यांनी गगनबावडा येतेच मतदानाचा हक्क बजावल्यानंतर छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनलचे सर्वच उमेदवार बहुमताने विजयी होतील हा विश्वास यावेळी व्यक्त केला. तर मतदानासाठी सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यानी पिवळ्या टोप्या घालून मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अंत्यंत चुरस निर्माण झाल्याचे चित्र सकाळच्या एक तासाच्या मतदान वेळतच पाहायला मिळत आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विकास संस्था गटातील १२ पैकी सहा जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १५ जागांसाठी ही निवडणूक आहे. निवडणूक रिंगणात ३३ उमेदवार उतरले असून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीत शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली समविचारी पक्षांचे एकत्रित पॅनेल रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.