कागल/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक पंचवार्षिक निवडणुकीसाठी बँकेचे संचालक आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सकाळी ८ वा. आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
कागल येथील शाहू हायस्कूलच्या इमारतीत सेवा संस्था गट, पतसंस्था बॅक गट, प्रक्रिया संस्था गट यासाठी प्रत्येकी एक आणि दुध व इतर संस्था गट यासाठी दोन खोल्या अशी मतदानाची सोय करण्यात आली आहे. गत वेळीही याच ठिकाणी मतदान झाले होते.
सत्ताधारी गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ हे विकास सेवा संस्था गटातून बिनविरोध झाले आहे. तर विरोधी आघाडीचे नेतृत्व खासदार संजय मंडलिक करीत आहेत.