सलग चौथ्या वषी बहुमान : जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकिंग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘बँको ब्ल्यू रिबन 2020’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सलग चौथ्यांदा हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. मार्च महिन्यात कर्नाटकातील म्हैसुर येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक व्हिक्टर डॉन्टस, आर. टी. मर्गज, नीता राणे, दिगंबर पाटील, प्रकाश गवस, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई उपस्थित होते.
अविज पब्लिकेशन, कोल्हापूर ही संस्था सहकार क्षेत्रासाठी देशपातळीवर एक मार्गदर्शक संस्था म्हणून 1999 पासून कामकाज करीत असून या संस्थेमार्फत विविध प्रकारच्या संस्थांची कामकाज पद्धती, सहकार क्षेत्रातील कायदे कानून व त्यामध्ये वेळोवेळी होणारे बदल, आधुनिक तंत्रज्ञान याबाबतची अद्ययावत माहिती संकलन व प्रसिद्धीचे कामकाज केले जाते. या संस्थेमार्फत प्रतिवषी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत असणाऱया व उत्कृष्ट कामकाज करणाऱया विविध प्रकारच्या बँकिंग कामकाज करणाऱया संस्थांसाठी पुरस्कार प्रदान केले जातात.
जिल्हा बँकेने आर्थिक मापदंडाचे उत्कृष्टरित्या पालन केल्याने त्याचप्रमाणे स्वमालकीचे डाटा सेंटर उभारून सीबीएस प्रणालीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना बँकिंग क्षेत्रातील विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गटातून ‘बँको ब्ल्यू रिबन 2020’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचा वितरण सोहळा मार्च 2021 मध्ये होणार आहे.
या पुरस्काराबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी समाधान व्यक्त केले असून या पुरस्काराचे श्रेय त्यांनी बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व ग्राहक यांना दिले आहे. तसेच भविष्यात जिल्हा बँकेकडून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रकारच्या सेवा-सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देऊन बँकेच्या ‘आपली माणसं, आपली बँक’ या ब्रीदवाक्मयाप्रमाणे बँकेचे कामकाज यापुढेही सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हा बँकेला यापूर्वीही विविध पुरस्कार मिळाले असून सांघिक कामगिरीमुळे जिल्हा बँकेने गरुडझेप घेतली आहे. बँकेचे डाटा सेंटरही अद्ययावत करण्यात आले आहे. त्यामुळे इतर बँकांनाही ते वापरण्यासाठी देऊ शकतो, एवढी प्रगती केली आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.