प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक राजकिय नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. प्रामुख्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे, पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणुक आणखी चुरस पाहायला मिळाणार आहे. यातच जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले आहेत. यातच पालकमंत्री सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवड पक्की झाली असुन याबाबतची अधिकृत घोषणा 22 डिसेंबरला निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे करणार आहेत.
अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले आहे. गगनबावडा संस्था गटातून सतेज पाटील बिनविरोध निवडून आलेले आहेत. या गटातून उमेदवारी दाखल केलेले दीपक लाड व महादेव पडवळ यांनी मंगळवारी माघार घेतल्याने मंत्री पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे.