मंत्री हसन मुश्रीफ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी आज हसन मुश्रीफांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कोल्हापूर जिल्हा बँकेत पक्षविरहित कारभार करून सर्व पक्षातील सर्व घटकांना सोबत घेऊन ही निवडणूक कशी बिनविरोध होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी भाजपबरोबर चर्चा करण्याची जबाबदारी आमदार विनय कोरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.