सांगली / प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालक पदी राष्ट्रवादी काँग्रेस कडून म्हैसाळ, ता. मिरज येथील युवा नेते व मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे तर काँग्रेसकडून जतचे सरदार पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
मनोज शिंदे हे माजी आमदार स्वर्गीय मोहनराव शिंदे यांचे सुपुत्र व पालकमंत्री जयंत पाटील यांचे नातेवाईक असून शिंदे यांच्या निवडीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगली, मिरज, आणि म्हैशाळ येथे एकच जल्लोष केला. नूतन स्वीकृत संचालक मनोज शिंदे व सरदार पाटील यांचे बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक आणि उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी अभिनंदन केले.