प्रतिनिधी / कुडाळ:
श्रीमती मनोरमा महादेव चॅरिटेबल ट्रस्ट व प्रगत सिंधुदुर्ग (मुंबई) या संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयास पाच स्टीमर मशिन्स उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आल्या. शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, संस्था सचिव संदीप साळसकर, विकास कुडाळकर, डॉ. प्रवीण सावंत, नागेश ओरोस्कर, धर्मा सावंत आदी उपस्थित होते.