प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रूग्णालय येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगडय़ा कंत्राटी महिला कर्मचाऱयानेच चोरल्याचे उघड झाले आह़े या प्रकाराची गंभीर दखल जिल्हा रूग्णालयाकडून घेण्यात आली आहे. संबंधित म†िहलेची सेवेतून हाकालपट्टी करण्यात आली आह़े अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक ड़ॉ संघमित्रा फुले यांनी दिली आह़े
कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेचा 9 ऑगस्ट रोजी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा अंत्यसंस्काराच्या वेळी मृताच्या हातामध्ये सोन्याच्या बांगडय़ा दिसून आल्या नाहीत़ त्यामुळे नातेवाईकांनी याबाबत प्रशासनाकडे दाद मागितली. मृताच्या हातातील बांगडय़ा चोरीला जाण्याच्या प्रकाराने जिल्हा रूग्णालयात एकच खळबड उडाल़ी
यावेळी मृताच्या नातेवाईकांनी बांगड्या परत द्याव्यात अन्यथा पोलिसांत तक्रार दाखल करू अशी भूमिका घेतली. घटनेचे गांर्भीय ओळखून जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी अंतर्गत चौकशीचे आदेश दिल़े चौकशीअंती हे दागिने जिल्हा रूग्णालयात काम करणाऱया एका कंत्राटी महिलेनेच चोरल्याचे उघड झाल़े संबंधित महिलेकडून हे दागिने हस्तगत करून रूग्णांच्या नातेवाईकांकडे देण्यात आल़े
चौकशीमध्ये कंत्राटी कर्मचारी दोषी असल्याचे आढळून आल्याने तिची तात्काळ सेवेतून हाकालपट्टी करण्यात आल़ी अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक ड़ॉ फुले यांनी दिल़ी
पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा नातेवाईकांपुढे पर्याय
जिल्हा रूग्णालयात झालेल्या या चोरीप्रकरणी कंत्राटी महिलेला सेवेतून कमी करण्यात आले आह़े चोरीला गेलेल्या सोन्याच्या बांगडय़ा नातेवाईकांना परत करण्यात आल्या आहेत़ असे असले तरी नातेवाईकांची इच्छा असल्यास ते पोलिसांत तक्रार दाखल करून शकतात़
- ड़ॉ संघमित्रा फुले,
जिल्हा शल्य चिकित्सक.