प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रूग्णालयासमोर झालेल्या कार अपघातात वृद्धेचा मृत्यू झाल़ा तर अन्य एकजण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 1 च्या सुमारास घडल़ी या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आह़े
शालिनी प्रभाकर बेर्डे (76, शहापूरी कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आह़े तर शमिका सुरेश गांधी (ऱा मारूती आळी, रत्नागिरी) जखमी झाल्या आहेत़ सुरेश सदानंद गांधी (50, मारूती आळी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश गांधी हे 1 जुलै रोजी इको कारने (एमएच 08 †िव्ह 9100) कोल्हापूर ते रत्नागिरी असे येत असताना त्यांच्यासोबत त्यांची सासू शालिनी बेर्डे व पत्नी शमिका प्रवास करत होती.
सुरेश गांधी रात्री 1 च्या सुमारास जिल्हा शासकीय रूग्णालय येथे आले असता झोपेमुळे त्यांच्या डोळ्यासमोर झापड आल्याने गाडीवरील ताबा सुटला. यावेळी त्यांची कार ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी बांधण्यात आलेल्या कठडय़ाला धडकल़ी या अपघातात शालिनी बेर्डे व शमिका गांधी यांना गंभीर दुखापत झाल़ी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असता शालिनी यांना वैद्यकीय अधिकाऱयांनी मृत घोषित केल़े तर शमिका गांधी यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़